मुंबई - जागतिक मानवाधिकार  प्रतिभा महासंमेलन २०१९ सांताक्रृझ मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते . त्यानिमित्ताने विविध देशांतील व राज्यातून आलेल्या सामाजिक, पर्यावरण, वैद्यकीय व इतर क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्कार करण्यात आला.          सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याची दखल घेत खिळेमुक्त झाडे अभियान संयोजक, भंडारा येथील राजेश प्र.राऊत यांना जागतिक मानवाधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                                               डॉ.के.टी.शंकर शेट्टी, जागतिक व राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानवाधिकार आयोग यांचे हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्विकारला.                                             त्यांना राष्ट्रस्तरीय, राज्यस्तरीय, समाजभुषण अशा असंख्य महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राजेश प्र.राऊत यांना इंटरनॅशनल ह्युमन राइटस काॅउंसिल या संघटनेला संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत विशेष स्थान असणाऱ्या  आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर नोबेल अवॉर्ड २०१९ जाहीर करण्यात आले आहे.               जागतिक मानवाधिकार नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल खुशी बहुद्देशीय फाउंडेशन भंडारा, अंघोळीची गोळी पुणे, महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी (मान्यताप्राप्त) मुंबई व युवा जनकल्याण भंडारा ,सुबोध किर्लोस्कर, रामभाऊ येवले, माधव पाटील,श्रीकांत पारधी, जाधवराव साठवणे ,नेमाजी करकाडे , हेमंत धूमनखेडे , आशिष भूरे ,झेड.आय. डहाके,अमित फुंडे, मुकेश ठवकर, पंकज डहाके, किशोर चेटुले,प्रदीप दिवे, सौ.स्वाती राजेश राऊत, सौ.मंगला डहाके , सौ.पुनम डहाके,सौ.नंदा चेटूले,सौ.स्वाती सेलोकर व कूमार वरद डहाके, जय सेलोकर व इतर सर्व पदाधिकारी यांचे राजेश प्र.राऊत यांनी आभार मानले.
 
Top