काल दिनांक १६/०४/२०१९ रोजी पंढरपूर नवीन बस स्टॅण्ड जवळील ॲक्सिस बँक जवळ रोडवर महिला नावे मैनाबाई महादेव जाधव, वय वर्षे ६६, राहणार - तुंगत, तालुका -पंढरपूर ,जिल्हा -सोलापूर ,शोभा शांताराम खर्डे , वय वर्षे ७६ , राहणार - नातेपुते ,तालुका- माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचेकडून ३६ किलो ४३० ग्रॅम वजनाचा तीन लाख ६४ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा पकडला असून याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे हे करीत आहेत .सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलिस अधिकारी, पंढरपूर विभाग डॉ.सागर कवडे,पंढरपूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोसइ. चंद्रकांत गोसावी, सपोफौजदार हनुमंत देशमुख, पो.हे.कॉ.सुजित उबाळे, मपोहेकाँ स्वाती लोंढे, पो.ना.किशोर गायकवाड, पो.ना.सतीश चंदनशिवे, पो.ना. मच्छिंद्र राजगे , पो.ना. इरफान शेख , पो.ना.शोएब पठाण, पो.कॉ. गणेश इंगोले ,मपो.कॉ.आरती घुमरे यांनी केले आहे


 

 
Top