फलटण -दि.११/४/१९ गुरुवार रोजी फलटण डॉक्टर्स असोशिएनची सर्वसाधारण वार्षिक सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली ,या वेळी मावळत्या कार्यकारणी कमिटीचे अध्यक्ष डॉ.जे.टी.पोळ यांनी पदभार नवीन कमिटचे अध्यक्ष डॉ.रविंद्र सोनवणे यांचेकडे सोपविला .संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. सागर माने,महिला उपाध्यक्षपदी डॉ. सौ संजीवनी राऊत, सचिवपदी डॉ. निनाद दोशी व खजिनदारपदी डॉ. योगेश गांधी यांची एकमताने निवड झाली .

प्रास्तविक संघटनेचे सचिव डॉ. निनाद दोशी यांनी केले . आभार प्रदर्शनाचे काम गतकमिटीचे सचिव डॉ. सचिन ढाणे यांनी केले .


 
Top