उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शनिवारी रात्री उशिरा खासगी बस ट्रकवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये बसच्या चालकासह ७ जण ठार झाले असून ३४ जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार हाअपघात मैनपुरी जिल्ह्यातील करहल पोलिस ठाण्यांतर्गत हद्दीत झाला. ट्रक बिघडल्यामुळे एक्स्प्रेस वेवर उभा होता. तेव्हा मध्यरात्रीनंतर वेगाने येणारी प्रवासी बस ट्रकवर जावून आदळली. ट्रक उभा आहे की सुरु आहे हे बस चालकाच्या लक्षात आले नाही. ही बस दिल्लीहून वाराणसीला जात होती. या बसमध्ये जवळपास ३० प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठविले.

 
Top