पंढरपूर - विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती छत्रपती शिवाजी चौक येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महिला गृहरक्षक दलाचे मेघा जरक,जना जाधव,आ.बी.नदाफ,नंदा सरवदे,कल्पना बिडकर यांच्यासह अनेक महिला गृहरक्षक व समादेशक शामराव परचंडे आदींच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड,निलेश आंबरे,महादेव धोत्रे,अशिष डोंबे,ऍड.राजेश भादुले,प्रा.अशोक डोळ,जयंती समितीचे अध्यक्ष मधुकर फलटणकर,विलास जगधने सर,किसन सरवदेे,जुबेर बागवान,गुरु दोडीया आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
  यावेळी बोलताना प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड म्हणाले की,पोलीस कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून अल्पवेतनावर गृहरक्षक दलाचे कर्मचारी काम करीत असतात.अशा या कर्तव्यतत्पर कर्मचार्‍यांचा सन्मान व्हावा या हेतूने आज त्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
 यावेळी आदम बागवान,सोहन जैस्वाल,रमेश सासवडकर,आण्णा सलगर,सुहास भाळवणकर,नागनाथ अधटराव,प्रताप रजपूत,इरकर,अजिक्य देवमारे,भारत माळी,सुरेश नवले,आशाताई बागल,मीराताई सर्वगोड,शैला तोंडसे,वंदना कसबे,बंटी वाघ,निलेश जाधव,अनिकेत मेटकरी,रवी सर्वगोड,सचिन जाधव,ऍड.प्रशांत सर्वगोड,सतिश क्षिरसागर,दिपक येळे,संदीप मुटकूळे,रामचंद्र ननवरे,अनिल झेंडे,सागर कदम,शंकर लोखंडे,मोहन शिंदेे,प्रशांत घोडके,प्रा.मसुरे सर,मोहन आदलींगे,रेेहान आतार,राबीया शेख,आदींसह प्रतिष्ठाणचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top