अहमदनगरअहमदनगर लोकसभा मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजप कडून सुजय विखे तर राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात आहेत.

राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.त्यांच्या  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील जर भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखेंचा प्रचार करणार असतील तर आम्ही आमच्या जावयाला मदत का करू नये,' असा सवाल कर्डिले यांचे कार्यकर्ते करत आहेत. अहमदनगरचं राजकारण हे पक्षापेक्षा नात्यांगोत्यांसाठी ओळखलं जातं. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुरूवातीला जाहीर केलं होतं की ते भाजपचाच प्रचार करतील. आता मात्र कर्डिले यांचे कार्यकर्ते उघडपणे संग्राम जगतापांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार सुजय विखेंसाठी हा मोठा धक्का आहे.

 
Top