पुणे  - फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील मंगळवार पेठ परिसरात तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी व स्टाफ असे पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारकडून माहिती मिळाली की, शिवाजी आखाड्या जवळ मंगळवार पेठ, पुणे येथील कोंबडी पुलावर एक  इसम त्याचे कमरेला गावठी पिस्टल लावून फिरत असून त्याने बिस्किट कलरचा हाफ शर्ट आणि जिन पँट घातलेली आहे .सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी सापळा रचला असता वरील वर्णनाचा इसम कोंबडी पुलावर शिवाजी आखाडा जवळ येत असल्याचे दिसले. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने जयेश लोखंडे असे सांगितले. त्यास दोन पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याने अंगात घातलेल्या बिस्किट कलर हाफ शर्टमध्ये कमरेला लावून ठेवलेले गावठी पिस्टल व दोन राऊंड मिळून आले. त्याची अंदाजे किंमत तीस हजार रुपये आहे. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १५४/२०१९ आर्म अँक्ट कलम  3 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करून पुढील तपास चालू आहे .सदर कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे शहर - सुहास बावचे,  सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना, पूणे शहर प्रदीप आफळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना विभाग पुणे शहर किशोर नावंदे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वाय.पी. सूर्यवंशी फरासखाना पोलीस हवालदार खुटवड, पोलीस नाईक श्री. चव्हाण,पोलीस नाईक श्री.चौगुले, पोलीस शिपाई वाल्मिकी यांनी सदरची कारवाई केली.
 
Top