पंढरपूर तालुका व शहर शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीमध्ये भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक अनिल दादा सावंत याची  शिवजन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिव जन्मोत्सव कार्यक्रम पाच ते सात मे पर्यंत  साजरा करण्यात येणार आहे. पाच मे रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे .सहा मे रोजी अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे . या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर जिल्हा समन्वय प्रा. शिवाजीराव सावंत सर,सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा परिषद सदस्या शैलाताई गोडसे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव,  जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवजन्मोत्सव  समितीचे अध्यक्ष अनिल दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. सात मे रोजी महाआरती होऊन उत्सव सोहळ्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती शिवसेना पंढरपूर  तालुका प्रमुख महावीर देशमुख व शहर प्रमुख रवींद्र मुळे यांनी दिली.

 या  बैठकीला कार्यकारी संचालक अनिल  सावंत , जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे ,उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,  तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवी मुळे ,विधानसभा समन्वय संजय घोडके , ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने, महेश कदम, सिद्धेश्वर कोरे ,विनोद कदम, पिंटू गायकवाड, महावीर अभंगराव ,लंकेश बुरांडे, सचिन बंदपट्टे, विनायक वनारे , दादा सावतराव , काका बुराडे,  कैलास नवले व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top