*मंगळवारी मतदान १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांच्या हाती ९ उमेदवारांचे भविष्य*

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि.२३ ) सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.या निवडणुकीत १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत.यात पुरुष मतदार ९ लाख ३५ हजार ८७८ इतके आहेत. महिला मतदार ९ लाख ३ हजार ९२ इतक्या आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १७ इतकी आहे.

         सोमवारी तालुक्यांच्या मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी २२९६ मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ८७३ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

          दिव्यांग मतदार केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.अंध मतदारां साठी ब्रेल लिपीतील डमी पत्रिका तसेच भिंग ठेवण्यात आले आहे. 

          सातारा लोकसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाचे ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यामध्ये सर्व सौम्य स्वरुपाचे गुन्हे असून, एकही गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.

          उमेदवारांकडून कारवाई करण्यासारखा गंभीर एकही कृत्य नाही.जिल्ह्यातील एकूण ३०१ मतदान केंद्र्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे.यावर जिल्हास्तरावरून नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निरीक्षण ठेवण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.यासाठी जमावबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, पाचपेक्षा जास्त लोक जमण्यास सक्त मनाई आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे.मतदानाच्या ४८ तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे.

 
Top