पंढरपूर - पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण घंटी यांच्या भावाने उसने पैसे घेतले होते मात्र ते पैसे परत दिले नाहीत म्हणून प्रदीप भूमकर, प्रशांत भूमकर ,अमर भूमकर, अंजली भूमकर यांनी जीवघेणा हल्ला केला होता .याप्रकरणी चारही आरोपींना बारा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा पंढरपूर जिल्हा न्यायाधीश सी. ऐस. बाविस्कर यांनी दिले आहे.
 याबाबत माहिती अशी की येथील श्रीकृष्ण घंटे यांचा भाऊ श्रीराम घंटी हा या आरोपींकडून तीन लाख रुपये घेऊन घरातून निघून गेला होता. हे पैसे मागण्यासाठी १५ मे २०१३ रोजी श्रीकृष्ण यांच्या घरी हे चारही आरोपी गेले होते त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाच्या डोक्यावर ,मांडीवर चाकूने वार केले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
या प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन सरकारतर्फे ९ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयासमोर मांडण्यात आल्या, यात श्रीकृष्ण घंटी ,प्रत्यक्षदर्शी कुणाल दिलीप हेळेकर, अमृता पांडुरंग घंटी या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या .तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल यावरून श्रीकृष्ण यांना ठार मारण्यासाठी हे चार जण आले होते असे सरकारी पक्षाने न्यायालयात निदर्शनास आणून दिले .यातील फिर्यादीचे वडील पांडुरंग हे माजी नगराध्यक्ष असून त्यांनी आरोपीना राजकीय वैमन्यस्यातून गोवण्यात आले असून  सदरचा हल्ला हा साध्या स्वरूपाचा असून यातून जीवितास धोका निर्माण होत नाही असा बचाव आरोपीच्या वकिलांनी केला होता. मात्र प्रदीप भूमकर ,प्रशांत भूमकर , अमर भूमकर आणि अंजली भूमकर यांना बारा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणी सरकारतर्फे अँडवोकेट सारंग वांगीकर यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे अँडवोकेट किशोर धारूरकर यांनी काम पाहिले .कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल रावसाहेब वाघमारे यांनी काम पाहिले.
 
Top