पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )- राज्यात कोणतीही अनुचित घटना घडताच सर्व देवस्थाने सुरक्षेच्या दृष्टीने हायाअलर्ट केले जातात. अशावेळी राज्याची दक्षिण काशी समजली जाणारी पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरच्या सुरक्षेसाठी ६ पोलिस अधिकारी व ६८ पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती असून त्यांना विठ्ठल भक्तांनी अत्याधुनिक फॅब्रिकेटेड अशी ९ फुट रुंद व ३५ फुट लांबीची पोलिस चौकी दिल्याने  पोलिसांची होणारी गैरसोयी दूर झाली आहे.ही पोलिस चौकी रुक्मिणी गोपूर शेजारी बसविण्यात आली आहे.
कै नंदकुमार ज्ञानबा मोढवे यांच्या स्मरणार्थ पांडुरंग नंदू मोढवे ,उपसरपंच नवनाथ नंदू मोढवे ,पोलीस पाटील वासुदेव ज्ञानोबा मोढवे ,चंद्रकांत ज्ञानोबा मोढवे मु. पो.टाकवे बुद्रुक ,तालुका - मावळ, जिल्हा - पुणे यांनी पोलिस चौकी भेट दिली आहे.यामुळे श्री विठ्ठल मंदिरच्या सुरक्षेसाठी असलेले पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मोढवे कुटूंबातील सर्वांचे आभार मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.    


 
Top