पंढरपूर ,(दिनेश खंडेलवाल )- पंढरपूरात गेल्या दहा वर्षापासून पेशवा युवा मंचच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे दहावे वर्ष असून यावेळी महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात या तीन राज्यातून २७ बटूंनी सोहळ्यात सहभाग घेतला होता. 

  या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीपूर येथील पांडुरंग सह.सा.कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक हे होते. तसेच पुणे येथील उद्योजक बाळासो थत्ते , मुकुंद देवधर, संतोष बडवे, हरिभाऊ पुजारी,प्रसाद गणपुले, उमेश विरधे आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बटूंना मंचाच्या वतीने पळी, सोवळे,,उपरणे, पेला, ताम्हण, संध्येची पोथी देण्यात आली. सायंकाळी प्रदक्षिणा मार्गावरून बटूंची सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेशवा युवा मंचाचे अध्यक्ष विनायक महादेवकर ,गणेश लंके,रामभाऊ बडवे,रामकृष्ण बिडकर सह सर्व सहकार्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

 
Top