आज पंढरपूर येथे सोलापूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असलेले काँग्रेसचे नेते उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ , आ. भारत भालके, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आ. रामहरी रुपनर शहराध्यक्ष अँड. राजेश भादुले, राष्ट्रवादीचे राजूबापू पाटील, युवराज पाटील मनसेचे दिलीप धोत्रे आणि रुक्मिणी उद्योगसमूहाच्या सौ सुनेत्रा पवार आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ही पदयात्रा पंढरपूर शहरातील शिवाजी चौक येथून भादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, रोहिदास चौक, महात्मा फुले चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बॅंक ते पुन्हा शिवाजी चौक या मार्गावरून आज शुक्रवार दिनांक  १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता ही पदयात्रा सुरू होणार आहे.  
या पदयात्रेस साठी कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी केली गेली आहे. या पदयात्रेनंतर कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे दुपारी ३ ते सायंकाळी  ७ वाजेपर्यंत पंढरपुरात विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांची येथील टिळक स्मारक मंदिर मध्ये संपर्क साधणार आहेत. सायंकाळी सात वाजता मा. सुशिल कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मातंग समाजाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास सोलापूर  आणि माढा लोकसभा मतदार संघातील मातंग समाजाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहरातील शिवाजी चौकातील शिवतीर्थावर होणारी ही सभा मोठी होण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे तसेच राष्ट्रवादी आणि मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करत असल्याचे  दिसत आहे.

 
Top