म्हस़वड ,ता. माण - "मी आहे आद्या"* हा कार्यक्रम चंदूकाका सराफ अँड सन्स यांनी राबवून पाळीच्या काळातील स्वच्छता' या आरोग्य विषय अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन वाटप व त्यासोबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असा स्त्री आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अभियान हाती घेतले आहे.चंदूकाका सराफ सुवर्णपेढीचा हा उपक्रम ग्रामीण स्त्रियांसाठी प्रत्यक्षात राबविण्याचा म्हस़वड ,ता. माण येथील अहिंसा पतपेढीने निर्णय घेतला असून आज पहिला कार्यक्रम माणदेशी फाउंडेशनच्या छावणीतील महिलांसाठी राबविण्यात आला,यावेळी माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी मनोगत व्यक्त केले.

     याप्रसंगी डॉ.मनिषा बाबर,माणदेशी फाउंडेशनच्या सौ.वनिता पिसे,करण सिन्हा, सौ प्रियांका आहेरकर, सौ.नलिनी फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ.मनीषा बाबर यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरासंबधी व या संदर्भातील सर्व बाबींवर महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी विचारलेल्या आरोग्यविषयक  प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

   या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप छावणीतील महिलांना करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणदेशी फाउंडेशनच्या सौ वनिता पिसे यांनी केले .आभार अहिंसा पतसंस्थेचे इम्रान मुल्ला यांनी मानले.

 
Top