पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मैं भी चौकीदार' या मोहिमेला सुरूवात केली. या मोहिमेची सर्वत्र जाहिरातबाजी सुरू आहे. 

तर काँग्रेस समर्थकांनी या विरोधात 'चौकीदार चोर है' जाहिरातबाजी सुरू केली. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्त्यांनीआपल्या वाहनावर हे स्टिकर्स लावले. या जाहिरातबाजीला निवडणूक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने भाजप समर्थकांना 'मैं भी चौकीदार' तर काँग्रेस समर्थकांना 'चौकीदार चोर है' याचे स्टिकर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर का असे स्टिकर हटवले नाहीत तर संबंधित समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना यासंबंधी तोंडी आदेश दिले आहेत. कर्नाटकातील काँग्रेसचे स्थानिक नेता अलेवूर हरीश किन्नी यांनी आपल्या कार वर 'चौकीदार चोर है' याचे स्टिकर लावले होते. किन्नी यांचा शहरातील कुक्कीकट्टे डायना चित्रपटगृहा जवळ पेट्रोल पंप आहे. किन्नी यांनी लावलेल्या या स्टिकर विरोधात भाजप समर्थकांनी आक्षेप घेतला होता. तर भाजप समर्थकांनी आपल्या वाहनांवर 'चौकीदार शेर है'  याचे स्टिकर लावले. याचबरोबर सोशल मीडियावर किन्नी यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल न टाकण्याचे अभियान सुरू केले. देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणाऱ्या किन्नी यांच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल न टाकण्याची शपथ देण्याचे अभियान सोशल मीडियावर चालू केले.

 
Top