पंढरपूर,(दिनेश खंडेलवाल)- पंढरपूर शहरातील सावरकर  पथावर असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेत ग्राहक चाळीस हजाराचा भरणा करण्यासाठी काउंटर लाईनला उभा होता तेव्हा दहा रुपयांचा बंडल खाली टाकून तुमचे पैसे पडलेत असे सांगत त्याच्या हातातील चाळीस हजाराचे बॅग चोरट्यांनी पळवली.कँश काऊंटरपाशी उभे असलेले सिक्युरिटी गार्ड दत्ता मोरे आणि हेमंत माने यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांचा पाठलाग केला. या चोरट्यांनी दोन रिक्षा बदलण्याचा प्रयत्न केला.मात्र तरीही त्यांना अन्नपूर्णा हॉटेलजवळ चप्पल लाईन येथे पकडून बँकेत आणले. त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी चोराला ताब्यात घेऊन चौकशी साठी पोलिस स्टेशनला नेले .दोन दिवसापूर्वीही स्टेट बँकेतून सुमारे नऊ लाख रुपयांची कॅश चोरट्यांनी लंपास केली होती आणि आज पुन्हा तशीच घटना घडल्याने बँक ग्राहकांत मोठी खळबळ उडाली आहे.
 
Top