जागोजागी उभारले बार येथे 

लावतात वाट देशाची येथे !!

मास्तर विद्यार्थी एकाच पेल्यात येथे 

कोण कोणाचा गुरु  येथे !!

पालक हतबल रोखण्या विकृति येथे 

सरकारी प्रोत्साहन सजले बार येथे !!

युवा बालिका तारुण्याचा बाजार येथे 

पैशासाठी चारित्र्याचा लिलाव येथे !!

नाही लाज अब्रू चाड कोणा येथे 

सुखाचे लालची सारे अंध येथे !!

नाही  संस्कृती संस्कार सत्व येथे 

भोगीच चारो दिशा बिनधास्त येथे !!


आनंद कोठडीया , जेऊर ,९४०४६९२२००

 
Top