पंढरपूर : येथील जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने कै. गोविंद (भाऊ) शंकर बाबर यांच्या स्मरणार्थ इसबावी येथील रिया हॉटेलजवळ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
कै. गोविंद बाबर हे जेष्ठ नागरिक संघटनेचे एक सदस्य होते. त्यांनी वृक्ष संवर्धनाचा तसेच पाण्याचा सुयोग्य वापर करण्याचा मोलाचा संदेश दिला. त्यांचे हे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे याच उद्देशाने जेष्ठ नागरिक संघटनेने कै. गोविंद (भाऊ) बाबर यांच्या नावाने पाणपोई सुरू केली आहे.
यावेळी बोलताना संघटनेचे सदस्य तात्या गोंजारी म्हणाले की, कै. गोविंद बाबर यांनी व्यायामचे महत्व तसेच संघटनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड, संवर्धन, पाणी बचतीबाबत याबद्दल जागृती निर्माण केली.
यावेळी अशोक बाबर, अण्णा बळवंतराव, विनायक भोसले (सर), नामदे सर, घोडके सर, शंकर नाईकनवरे (सर), आबा बोडके, नाळे काका, यादव सर, शिंदे सर, चंद्रकांत देशमुख, नितेश गायकवाड, अजिंक्य नवले, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, सुभाष पवार (सर), बाबर कुटुंबिय व हॉटेल रियाचा सर्व स्टाफ उपस्थित होते.
 
Top