इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार असून महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी त्याच्या मदतीला असणार आहेत. भारतीय संघाने १९८३ आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. २००७ मध्ये भारताने ट्वेंटी-20 विश्वचषकही नावावर केला आहे. विशेष म्हणजे २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सात खेळाडू २०१९ च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.

भारतीय संघ -

शिखर धवन, रोहित शर्मा,विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

 
Top