औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडाचे निशाण फडकवलेल्या औरंगाबाद येथील काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची अखेर काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जालन्यात सभेदरम्यान सत्तार यांच्या हकालपट्टी बाबत घोषणा केली आहे.अब्दुल सत्तार यांनी आमदारकीसह जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच ‘काँग्रेसने मला धोका दिला’ असं म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे आता पक्ष विरोधी कृती करत आहेत अशा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते ज्यामधे पक्षाने दिलेली जबाबदारी न पाळता विरोधकांना फायदा होईल अशी क्रृती केली अशांची माहिती घेऊन कारवाई सुरू करणार असल्याचे समजत आहे.   

 
Top