वादळातून : पक्षांतर चांगभलं.............


काल ते इकडे होते

आज ते तिकडेआहेत

इकडे म्हंजी सत्तेत

तिकडं म्हंजी इरोधी पक्षांत!


त्यांनी अगदी सहज उडी मारली

कांही क्षणात आवशयक नाटक केली

कार्येकर्त्यांचा मेळावा ,त्यांचा होकार

नंतर मुख्यमंत्री यांच्या दरबारात प्रवेश

हे अगदी सुलभतेने होत गेलं

कोणाला इधिनिषेध समंदी तराट !!

त्यांनी म्होहतुर काय म्हणूनशान लावला

लफडी जिरत्याल ,चौकशी गाडत्याल

खुर्ची मिळेल ,वारासदाराला वहिवाट लाभलं

वाहत्या वाऱ्यासोबत राहील तरच पदरात पडलं

चांगभलं होईन सर्वांचेच

म्हणूनच म्हणतो पक्षांतर म्हंजीच चांगभलं ! चांगभलं!!


वादळातून:तिसरा डोळा,


रान तापवत आहेत , कांन भरत आहेत

घाम काढत आहेत , हात जोडत आहेत

गरजेनुसार वाकत आहेत

खरं खोटं जमलं तसं पेरत आहेत

जागोजागी लाळ घोटत आहेत

मतासाठी काय पण करत आहेत

सर्वाना होय म्हणत आहेत

गाढवाला देखील घोड म्हणत आहेत"


आनंद कोठडीया,जेऊर , ९४०४६९२२००

 
Top