या भागातील पाणी दोन लोकांच्या फायद्यासाठी वापरले.
माढा ,(दिनेश खंडेलवाल)- माढा ४३ लोकसभा मतदार संघासाठी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या यावेळी शेगाव दुमाला येथे मतदारांना आव्हान करताना ते म्हणाले की, माढा मतदार संघाचा विकास व प्रगतीसाठी भाजपला मतदान करा त्याचबरोबर टाटा आणि लवासाचे पाणी भीमा नदीत पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरणातून एकशे दहा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी ही योजना सर्वांच्या हिताची आहे. सीना बोगद्याचा फायदा या भागातील दोन लोकांसाठीच होतोय अशी प्रतिक्रिया रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेगांव ता. पंढरपूर येथे दिली.
या भागातील प्रचार दौऱ्यासाठी पंढरपूर शहर विकास आघाडीचे नेते युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक ,समाधान काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे आदी उपस्थित होते . मतदार संघातील सर्व नेतेमंडळी एकत्र आल्याने  रणजीतसिंहांचा विजय निश्‍चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
Top