नळदुर्ग येथील किल्ल्यात बोटींग करताना बोट बुडून दुर्घटना घडली आहे.या दुर्घटनेत 3 पर्यटकांचा पर्यटकांचा बूडून मृत्यू झाला आहे. बुडालेल्यांपैकी २ लहान मुलांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. नळदुर्ग येथील किल्ल्यात बोटींग करताना बोट अचानक बुडाली. यावेळी बोटीतील ८ प्रवासी होते. त्यापैकी ५ जणांना वाचविण्यात यश आले मात्र ३ जण बुडाले.

किल्ला देखभाल करणाऱ्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी यांचे नातेवाईक सानिया फारुक काझी (९), ईझान एहसान काझी (७), अलमास शफीक जहागिरदार (१०) सर्व रा.काझी गल्ली,नळदुर्ग अशी बुडालेल्यांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. .
या मुलांनी किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर आठजण बोटमध्ये बसले. बोट सुरु होवून बोरी नदीच्या काठाकडे जात असताना एका मुलगा सेल्फी घेण्यासाठी जागेवरुन उठून पुढे गेला. त्यापाठोपाठ काही मुले पुढे आल्याने बोटीचा तोल गेल्याने वरील तिघे बोरी नदीच्या पात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 
Top