जैन धर्मातील प्रभावी संत तपस्वी प्रथमाचार्य चारिञ चक्रवर्ती श्री श्री १०८ शांतीसागर महाराज यांचे मुनिदिक्षा शताब्दीमहोत्सव समारंभ तीर्थक्षेत्र हुमचा येथे होणार आहे.

  आचार्य श्रीचा जन्म यळगूड ता.हातकणंगले येथे १८७२ मध्ये झाला होता.त्यानी १९२० साली देवेंद्रकिर्ती महाराज यांच्याकडून मुनिदिक्षा घेतली होती.अंत्यत तपस्वी व ३५ वर्षातील २५ वर्ष उपवास झालेले व खंडीत झालेले जैन साधूची परंपरा सुरू करणारे साधू म्हणून त्याना देशभरातून ओळखले जाते.त्याचे मुनिदिक्षास शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने हुमचा कर्नाटक येथे दि २० ते २४अखेर विविध कार्यक्रम होणार असून दि  २० रोजी आचार्य शांतीसागर विधान,२१ रोजी गणधरवलय विधान,दि २२ रोजी चौसष्टवृध्दि विधान तर दि.२३ रोजी रथयात्रा व २३ रोजी शांतीविधान होणार आहे.यास विशेष मार्गदर्शन पंचम पटटाधिश आचार्यश्री वर्धमानसागर महाराज याचे लाभणार आहे.

या कार्यक्रमास जगद्विख्यात स्वस्तिश्री चारूकिर्ती भट्टारक महास्वामी श्रवणबेळगोळ, स्वस्तिश्री भट्टारक डाॅ लक्ष्मीसेन स्वामी कोल्हापूर, स्वस्तिश्री भट्टारक ललितकिर्ती कार्कल, स्वस्तिश्री  भट्टारक भुवनकिर्ती कनकगिरी, स्वस्तिश्री भट्टारक धवलकिर्ती अरिहंतगिरी, स्वस्तिश्री भट्टारक भानुकिर्ती कमबंदहली, स्वस्तिश्री भट्टारक चारूकिर्ती पंडिताचार्य मुडबिद्री, स्वस्तिश्री भट्टारक लक्ष्मीसेन जिनकांची, स्वस्तिश्री भट्टारक डाॅ देवेंद्रकिर्ती हुमचा, स्वस्तिश्री भट्टारकस्वामी सौदा, स्वस्तिश्री भट्टारक लक्ष्मीसेन नरसिंह्पूर, स्वस्तिश्री भट्टारक धर्मसेन वरूरु, स्वस्तिश्री भट्टारक जिनसेन नांदणी, स्वस्तिश्री  भट्टारक सिद्धांतनंदी आरतीपूर हे देशभरातील भट्टारक व पद्मविभूषण डाॅ.विरेंद्र हेगडे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन शताब्दी महोत्सवाचे राष्ट्रीय आयोजन समितीचे महामंञी प्रा.डी.ए.पाटील यांनी केले आहे.

 
Top