पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे स्वाभिमानी सामाजिक संघटनेचे विठ्ठल बागल सर यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांची तहान भागवण्यासाठी मेन रस्त्यावर पाणपोई सुरू केली आहे. या पाणपोईचे उद्घाटन गादेगावचे सरपंच दत्तात्रय हुंडेकरी यांचे हस्ते करण्यात आले .
 विठ्ठल बागल सर यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवले असून गेल्या दहा वर्षापासून गादेगावच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई दर वर्षी सुरू करतात . विठ्ठल बागल यांनी गावात यापूर्वी जनावरांसाठी चारा वाटप , लहान मुलांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण असे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजकार्य जोपासले आहे असे गादेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी क्रमांक १ चे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब बागल यावेळी म्हणाले  . 
या कार्यक्रमासाठी  गादेगाव येथील  नंदकुमार साळुंखे,अंकुश बागल,आनंद पाटील,महादेव घाडगे , सिद्धनाथ बागल, दिलीप म्हस्के, मच्छिंद्र बागल, नितीन आसबे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top