पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )- येथील फत्तेपुरकर नगरमधील रहिवासी सोपान नारायण निकते हे आपल्या ईरटीगा गाडी क्र. mh13 बी एन 8518 यामध्ये बसून पंढरपूरकडे सांगोला येथून रात्री साडेदहाच्या सुमारास येत असताना मेथवडे जवळ गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याने या भीषण अपघातात गाडीतील सर्वजण जख्मी झाले होते. त्यांना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान पत्नी अश्लेशा सोपान निकते वय २९ मुलगा आरव सोपान निकते वय ५ यांचा मृत्यू झाला असून सोपान नारायण निकते हे  गंभीर जखमी झाले आहेत.  वाढदिवसासाठी सर्वजण  सासूरवाडीकडे सांगोला येथे गेले होते.

आज सकाळी अपघातातील माय लेकाचा अंत्यसंस्कार भूवैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले. या वेळी नातेवाईक, समाज, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.फत्तेपूरकर नगरवर शोककळा पसरली आहे .

 
Top