म्हसवड - विजय भगवान पिसे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी) परीक्षेत उज्वल यश संपादन करत पी.एस.आय.पदी निवड झालेबद्दल अहिंसा पतसंस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभा मध्ये म्हसवडचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नितिन दोशी यांनी उद्गार काढले.

  या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नितिन दोशी म्हणाले की, विजय पिसे याने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत पितृछत्र हरवले असताना सुद्धा शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे चालू ठेवली. व या पदापर्यंत मजल मारली आहे. प्रशासकीय सेवेत राहून त्याने देशसेवा करावी. तसेच गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करावे. त्याच्या संपूर्ण यशाचे श्रेय हे ज्या माऊलीने त्याच्यावर संस्कार केले ,त्याला घडवले त्या मातेला जाते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना सिद्धनाथ हायस्कुल व ज्युनि.कॉलेजचे प्राचार्य अरुण काकडे म्हणाले की माण तालुका हा पाण्याने जरी दुष्काळी असला तरी इथे अधिकारी वर्गाचा सुकाळ आहे .विजय पिसे याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण केले. तसेच अभ्यासू वृत्ती, जिद्द ,चिकाटी  विजय यांनी यश संपादन केले आहे.विजय यांने आणखी मोठ्या पदावर मजल मारावी यासाठी शुभेच्छा.

     आपल्या सत्काराला उत्तर देताना विजय पिसे याने आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आईला, भाऊ गणेश व त्याला सर्व प्रकारची मदत करणाऱ्या असंख्य मित्र वर्गाला दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे धाडस आईने माझ्या मनावर रुजवले व त्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो . मनात जिद्द असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही . नितिनभाई व अहिंसा पतसंस्था जे उपक्रम राबविते ते म्हसवडमध्ये कोणतीच पतसंस्था किंवा बँका राबवत नाहीत. यशस्वी लोकांना शाबासकी देण्याचे काम नितिनभाई व अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे 

     या कार्यक्रम प्रसंगी सौ.नलिनी पिसे फडतरे, श्री काटकर सर, जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सुजय दोशी, अनिल देशमाने,बाळासाहेब सरतापे, व्यवस्थापक पतंगे, उपव्यवस्थापक आहेरकर, व म्हसवड मधील प्रतिष्ठीत नागरिक, व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज व्होरा यांनी केले.सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले.

 
Top