पंढरपूर (दिनेश खंडेलवाल ) - काळाची गरज ओळखून,  ब्राह्मण समाजातील मुलांकरता सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.

आजही ग्रामीण भागातील आपल्या काही बांधवांना काही वैयक्तिक अडचणीमुळे आपल्या पाल्याचे व्रतबंध संस्कार सोहळा करता येत नाही  व "न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते" या हेतूने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  परब्रह्म परमात्मा श्रीपांडुरंगाचे नगरीत (श्रीक्षेत्र पंढरपुर) मध्ये बुधवार दिनांक  २४/०४/२०१९  या दिवशी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. हा व्रतबंध सोहळा  पद्मशाली धर्मशाळेत (आपटे उपलप प्रशालेशेजारील) होणार आहे.

या उपनयन संस्कारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बटूस पळी पेला ताम्हण सोवळे उपरणे संध्याचे पुस्तक भिक्षावळ व प्रत्येक बटूची मोठ्या थाटामाटात शोभायात्रा निघणार आहे. सर्व समाज बांधवांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पेशवा युवा मंच, पंढरपूरने केले आहे.

      अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर खालील नंबर वर संपर्क करावा.-9765277325 , 9923982560 ,9764283733 

 
Top