पंढरपूर ,(दिनेश खंडेलवाल )- पंढरपूर तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने शिवयोगी मंगल कार्यालय पंढरपूर येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या लोकसभेच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . महिला आघाडीच्या नवीन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या .येणाऱ्या लोकसभेसाठी सर्व शिवसैनिकांनी शिवसेनेने केलेले काम सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे असून युतीच्या जो कोण उमेदवार  असेल पक्षप्रमुख जो आदेश देतील त्या  उमेदवाराला निवडून देण्याचे आहे. असे मार्गदर्शन पर आवाहन सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी केले.

 सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील , माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हा प्रमुख संभाजी शिदे ,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत सहसंपर्कप्रमुख  लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील ,माजी जिल्हाप्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, जिल्हाप्रमुख  प्रमुख संभाजी राजे शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैलाताई गोडसे ,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष जयवंत माने, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव ,तालुकाप्रमुख महावीर देशमुख, शहर प्रमुख रवी मुळे, महिला आघाडी तालुका संघटक आरती बसंवती, महिला आघाडी शहर संघटक पूर्वा पांढरे , विधानसभा संघटक संगीता पवार ,समन्वयक रुबीना शेख रेहना आतार, युवा सेना तालुकाप्रमुख युवराज अभंगराव , युवा सेना शहर प्रमुख महावीर अभंगराव, युवा सेना शहर समन्वयक पिंटू गायकवाड, उपशहर प्रमुख विनायक वनारे ,लंकेश बुरांडे ,सचिन बंदपट्टे ,उपतालुकाप्रमुख अर्जुन भोसले ,नितीन शेळके, सुनील केंगार, अविनाश वाळके ,विनोद कदम, तालुका उपप्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख , उपशाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top