पक्ष निष्टेच्या नावाने एकाच पक्षासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित भावनेने घालविणारे नेते भविष्यकाळात दिसणार नाहीत. ‘पक्षाचा आदेश’ आणि ‘निष्ठावंत ’हे शब्द आता संपल्यात जमा आहेत. सुजय विखे पाटील, रणजितसिंह माहिते पाटील,संजयमामा शिंदे ,डॉ भारती पवार,प्रविण छेडा यांच्या वेगवेेगळ्या पक्ष प्रवेशाने हे सिध्द होत आहे. संपल्यात जमा आहेत.  

या  प्रवेशांनी राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे असे मत व्यक्त केले जात आहे .राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत हे दोन्ही पक्ष भाजपाला शह देण्यासाठी सहकारी पक्षांच्या सहकार्याने महाराष्ट्रात लढणार आहेत. राज्यातील अनेक घराण्यांवर अन्याय झाला आहे म्हणजे दुसर्‍या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी उमेदवारीचा विचार सुध्दा करू नये असाच याचा अर्थ होतो . तत्वानुसार  राजकारणातील निष्ठा, सिध्दांतवादीता, पक्षाची ध्येय धोरणे आता कुणालाही मान्य नाही.घराण्यांच्या कुठेही न थांबण्याचा परंपरेसाठी आपल्या पक्षनिष्ठा ते कोणत्याही पक्षासाठी बदलायला तयार होत आहेत .कारण सत्तेतुन अमाप संपत्ती आणि त्यातुन पुन्हा सत्ता, त्यामुळे नविन नेतृत्व राज्यात तयार होऊच शकत नाही अशी एकूण राजकीय परिस्थिती आहे. पदासाठीचा आणि सत्ता ताब्यात ठेवण्याचा चाललेला गलिच्छ खेळ निश्चितपणे देशाला खालच्या दर्जाच्या राजकारणाला नेणारा आहे. आपल्यात क्षमता असेल तर बंडखोरी करून घराणेशाही संपविण्यासाठी तयाारी केली पाहिजे. सुज्ञ मतदारांनीही अंधभक्ती सोडून जनतेची दिशाभूल करून आणि मतदारांचा विश्वासघात करून या पक्षातुन त्या पक्षात जावून उमेदवारी करणार्‍यांना मतपेटीतुन धडा शिकवला  पाहिजे. जनतेचा विश्वासघात करणार्यांना  मतदानाच्या माध्यमातुनच त्यांची  जागा दाखवून दिली पाहिजे. परंतु तसे होतांना दिसत नाही, आदर्श आणि तत्व यांना कुठेही थारा नाही.
 
Top