पंढरपूर (दिनेश खंडेलवाल ) -वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ समजले जाणारे येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणावरून दोन दिवसापूर्वीच पोलीस अधिकारी विश्वास साळोखे यांनी त्या ठिकाणी बसणारे फुलांचा हार, तुळशीहार, गंध लावणारे ,नारळ विकणारे, बेदाणा सायकलवर फिरून विकणारे तसेच फळ विक्रेत्यांसह चुडे, रांगोळी सामान आदी विक्रेत्यांना बंदी करण्यात आल्याने त्यांनी थेट लोकप्रतिनिधी आमदार भारत भालके यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली असता आमदार भालके ही त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी मंदिर सुरक्षा पोलीस अधिकारी व आमदार भालके यांच्यामध्ये खडाजंगी झाली याचाच परिणाम म्हणून आज आमलकी एकादशी दिवशी हातावर पोट असलेल्या अशा सर्व व्यापाऱ्यांना बसण्यास मनाई केल्याने भाविक भक्तांचे खूप हाल झाले.
 भाविकांना आज आपल्या आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला हारही नेता आला नाही त्याच बरोबर फुलासह इतर साहित्य मिळत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागला. भाविकांची ही गैरसोय टाळण्यासाठी आमदार भारत भालके कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे आज पंढरपुरातील पत्रकार परिषदेत सांगितले
 
Top