पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )- पंढरपूर तालुक्यातील आढीव गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी विविध उपक्रम राबवून समाजसेवेचा वसा चालू ठेवला आहे .रखरखत्या उन्हामध्ये गोधना ला वाचवण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची गोशाळा, मंगळवेढा तालुक्यातील यड्रावची गोशाळा तसेच पंढरपूर शहरातील धर्मार्थ गौरक्षण संस्था या ठिकाणच्या गायीना सुमारे दहा ते पंधरा टन हिरवा चारा दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी मोफत वाटप केला आहे . याबरोबरच यापूर्वी त्यानी चारा छावण्यांमध्ये हिरवा चारा दिला आहे .गोधन वाचवण्यासाठी या वर्षापासून गोरक्षण धर्मार्थ संस्था व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती गोशाळा याठिकाणी हिरवा चारा मोफत देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विधवा महिलांना साड्यांचे वाटप, पंढरपूरच्या यात्रेमध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अशा विविध माध्यमातून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशानेच प्रत्येकांना मदतीचा हात पुढे करत असतात. आपली छोटीशी मदत अनेकांना उपयुक्त ठरणार आहे या विचारानेच त्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामामध्ये अग्रेसर राहून कार्य केले आहे. आपल्या शेतातील हिरवा चारा मकवान विक्री न करता गोशाळेमध्ये गोधन वाचवण्यासाठी मोफत देण्याचे कार्य सुरू केल्याने त्यांचे कौतुक होत आहे . जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत आपण हे कार्य अविरत सुरू ठेवणार आहे अशी प्रतिक्रिया दिनकर चव्हाण यांनी ज्ञानप्रवाहशी बोलताना व्यक्त केली.
  यावेळी डॉ प्रकाश गांधी, रामकृष्ण क्षीरसागर,सुरेश दुनाखे,अरूण निपाणकर, सतिश निपाणकर , महादेव खंडागळे, तानाजी घाडगे आदि उपस्थित होते 
 
Top