भारत विकास परिषदेचा “ स्थापना दिन व दायित्व ग्रहण” सोहळा संपन्न

पंढरपूर ( प्रतिनिधी ) - भारत विकास परिषद हि देशात कार्यरत स्वयंसेवी संस्था म्हणून कार्य करीत आहे. राजकारण विरहीत सेवाभावी संस्था म्हणून याकडे पाहिले जाते. समाजात भारतीय संस्कृती हि संस्कारातून जपण्याचे आणि रुजविण्याचे कार्य करा असे प्रतिपादन भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय समूहगान स्पर्धाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताजी चितळे यांनी प्रतिपादन केले. येथील भारत विकास परिषदेचा “ स्थापना दिन व दायित्व ग्रहण “ सोहळा संपन्न झाला. या वेळी डॉ सुरेंद्र काणे यांनी भाविप अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

      या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी भाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुणे येथील दत्त्ताजी चितळे,मुख्य अतिथी म्हणून विद्याधर ताठे, भागवताचार्य वा.ना.उत्पात,भाविपचे पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग,प्रांताध्यक्ष रमेश विश्वरूपे ,प्रांत महासचिव अजय लोखंडे आदि प्रमुख उपस्थित होते. माधुरी जोशी यांच्या वंदे मातरमने सुरवात झाली. डॉ.वर्षा काणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रास्ताविक प्रांताध्यक्ष रमेश विश्वरूपे यांनी केले .  मंदार केसकर व मुकुंद कर्वे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

    यानंतर डॉ सुरेंद्र काणे यांनी भाविप पंढरपूर शाखेचे अध्यक्ष म्हणून तर वि.मा. मिरासदार यांनी उपाध्यक्ष,महावीर गांधी यांनी सचिव , अजित कुलकर्णी यांनी खजिनदार म्हणून शपथ व पदभार घेतला. 

या वेळी भागवताचार्य वा.ना.उत्पात यांनी आशीर्वादपर भाषणात भाविप कडून समर्थ राष्ट्र उभारणीचे कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त केली.

 पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यापासून भारतीय संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न करा असे सांगितले.

 या माध्यमातून समाजातील अनेक गरजू,निराधारांना सेवा देणार असून चांगले कार्य करून दाखवू असा विश्वास पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे यांनी व्यक्त केला. 

 परिषदेच्या प्रांतीय संघटणसचिवा सौ विप्र यांनी ,संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा ,समर्पण या परिषदेच्या पंच सुत्रीच्या आधारे काम करण्याचे सांगितले.परिषदेचे प्रांत महासचिव अजय लोखंडे यांनी पंढरपूर शाखेचे सहसचिव विठ्ठल वाघोलीकर,संघटक मंदार लोहोकरे,महिला संघटक माधुरी जोशी, सेवा प्रमुख सुनील उंबरे आणि डॉ अनिल पवार,भारत को जानो स्पर्धा प्रमुख प्रा. मेधा दाते,प्रदीप कुलकर्णी, गुरुवंदन प्रमुख मंदार केसकर,मोनिका शहा,समूहगान स्पर्धा प्रमुख स्मिता कोर्टीकर,राजेश खिस्ते यांच्या सह परिषदेच्या ४५ सभासदांनी शपथ दिली.या वेळी विद्याधर ताठे,परिषदेचे पंढरपुरचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र काणे यांनी समोयोचीत भाषण केले. परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन, जिल्हा संघटक सुधीर देव यांनी शुभेच्छा दिल्या .

 
Top