मुंबई :
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी१९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायस्वाल यांना बढती मिळाली आहे तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदत वाढ देण्यास केंद्राने नकार दिला. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जायस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जायस्वाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये उच्चपदावर काम प्रतिनियुक्तीवर काम करत होते. राज्य सरकारने २०१८ मध्ये त्यांना पुन्हा राज्याच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्रानेही त्याला मंजूरी दिली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली होती.तत्पुर्वी ते एटीएसचे डीआयजी म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी २००६ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपासही केला होता.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

 
Top