नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी :
 गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत.काहीजण युद्ध करा, अशा आक्रमक भावना व्यक्त करत आहेत. मात्र काही प्रशासकीय अधिकारी, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामुख्याने युवक-युवतींनी युद्धखोरीविरोधात सोशल मीडियात आपली भूमिका मांडताना युद्धात सामान्य माणसांचं रक्त सांडतं, तर राजकारणी आणि उद्योगपती अशा युद्धांचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात, अशा आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नागरिकांनी #SaysNoToWar हा हॅशटॅग ट्रेंड करत आपल्या भावना व्यक्त केला आहेत.
 
Top