पंढरपूर,(दिनेश खंडेलवाल) -आज दि.२८/२/२०१९ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पंढरपूर शहरात MIDC  उभारण्यात यावी यासाठी अनोख्या पद्धतीने साखर वाटप आंदोलन करण्यात आले. पंढरपूर शहर व तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पंढरपूरला स्वतंत्र MIDC ची अत्यंत गरज असताना सुद्धा स्थानिक नेते व प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्या मुळे तरुणांच्या नोकरी चा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनविसे ने याविरोधात साखर वाटप आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसे चे जिल्हा संघटक सागर बडवे व मनसेचे विभाग प्रमुख अमोल घोडके उपस्थित होते. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते किरणराज घोडके ,छावा युवक संघटनेचे शहर अध्यक्ष विकी झेंड,शिवबुद्ध संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक संदीप मुटकुळे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुमीत शिंदे, छावा क्रांतिवीर संघटनेचे सागर कदम यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मनसेचे अमित लकेरी ,उल्हास घुले व निलेश कदम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top