पंढरपूर-अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार भारत भालके व माता भगिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आजी माजी सैनिकांचा सन्मान, काॅटेज हॉस्पिटलमधिल परिचारिकांचा ,नगरपालिका सफाई महिला कर्मचारी यांचा तसेच मराठा महासंघाच्या माजी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा सन्मान,राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले बद्दल मानसी महाडिक यांच्या सह उपस्थित प्रमुख पाहुणेंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून, दहशतवाद्यांचा(पाकिस्तानचा)जाहीर निषेध करण्यात आला. यानंतर शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा काढण्यात आला.

यामध्ये सनई,चौघडा,बैलगाडी,घोडे,पारंपारिक वाद्य,पारंपारिक वेशभूषा,मर्दानी खेळ, देखावे,हत्तीवर शिवरायांच्या वेशभूषेत शिवभक्त हभप रविंद्र महाराज काळे असून,महिला व पुरुष डोक्याला भगवा फेटा बांधून,शिवरायांच्या जयघोषात,शिवमय वातावरणात सहकुटूंब सहपरिवार भव्य दिव्य पालखी सोहळा  पंढरपूर शहरातून  काढण्यात आला.

याप्रसंगी आमदार भारत नाना भालके,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,जिल्हाउपाध्यक्ष सचिन गंगथडे,मार्गदर्शक सतिश धनवे सर,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,तालुका उपाध्यक्ष प्रशांत नागणे,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना शहराध्यक्ष नागेश गायकवाड,रिक्षा संघटना शहर उपाध्यक्ष यशवंत बागल,रिक्षा संघटना शहर सचिव प्रमोद कोडग,संतोष गंगथडे सर ,अनंत नाईकनवरे साहेब,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रा रजनी जाधव,तालुका उपाध्यक्षा सौ प्रभावती गायकवाड, शहराध्यक्षा डॉ संगीता पाटील,युवती संघटना शहराध्यक्षा अँड प्राजक्ता शिंदे,सौ थोरवत,सागर सावंत,राहुल थिटे,अनिल बाबर,गणेश माने,सावंत सर,महेश माने, पांडुरंग शिंदे,महेश बोडके,प्रविण व्यवहारे, प्रणव गायकवाड,लखन चव्हाण, रोहित चव्हाण,जीवन गायकवाड,चरण गायकवाड, उमेश क्षीरसागर,सोमनाथ पवार,विकास चव्हाण, विलास मोरे,अजिंक्य पवार,अविनाश गिड्डे,अतुल काकडे,जगदाळे,शिंदे यांच्यासह या शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्यात सहपरिवार आले होते. 

 
Top