"वयोश्री" योजनेअंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील १३,००० ज्येष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर बारामतीत संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते साधने वाटप करण्यात आले. 

 राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी बारामतीमध्ये होत आहे, याचे समाधान आहे. आतापर्यंत झालेल्या शिबिरांमध्ये वीस हजारांहून अधिक ज्येष्ठांना कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आयुष्याच्या सरत्या काळात अशा योजनांचा वृद्धांना मोठाच आधार असतो ,असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले आहे असे आपल्या ट्विटर अकाउंटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे. 
 
Top