पंढरपूर -पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे आणि  SDPO पोलीस पथक यांनी एकत्रीत कारवाई करत गोविंद नगर वाखरी, तालुका पंढरपूर  या ठिकाणी अवैद्य दारू धंद्यावर धाड टाकली.

 यात हकीकत अशी की, दिनांक.१२/०२/ २०१९ रोजी ८ वा. चे सुमारास गोविंद नगर वाखरी, तालुका पंढरपूर या ठिकाणी यातील आरोपी सुरेखा तानाजी काळे, आशाबाई विलास  चव्हाण वय ४० वर्ष यांनी आपले कब्जात बेकायदेशीर रित्या ३ प्लॅस्टीक बॅरल त्यात ६०० लिटर गुळमिश्रीत रसायन असे एकुण ७५०० रूचे व ३०लिटर हातभटटी दारू किंमत ३२० अंदाजे असे परिस्थितीत मिळुन आली त्यामुळे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे आणि  SDPO पोलीस पथक यांनी एकत्रीत या अवैद्य दारू धंद्यावर प्रोव्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक.34/2019 मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम.65 ई,फ प्रमाणे कारवाई केली. याबाबत पोकॉ/ २१५० पंजाब इंद्रजीत सूर्वे नेमणूक पंढरपूर शहर.पो.ठाणे सध्या उपविभागीय कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. ही कारवाई पंढरपूर  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

 
Top