पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे ४०केंद्रीय राखीव दलाचे जवान शहीद आहे. त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे.हल्ल्याची योजना 'जैश-ए-मोहम्मद'चा पाकिस्तानी म्होरक्या कामरान याने केल्याचा संशय असून, तो पुलवामा, अवंतीपुरा अन् त्राल या भागात सक्रिय आहे. त्राल जवळच्या मिदुरा येथून या हल्ल्याचा कट शिजल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा पोलीसशोध घेत आहेत. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (१४ फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला होता पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामध्ये आसाम (१), बिहार (२), हिमाचल प्रदेश (१), जम्मू-काश्मीर (१), झारखंड (१), कर्नाटक (१), केरळ (१), मध्य प्रदेश (१), महाराष्ट्र (२), ओदिशा (२), पंजाब (४), राजस्थान (५), तमिळनाडू (१), उत्तर प्रदेश (१२), उत्तराखंड (२), पश्चिम बंगाल (१) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या बसला जोरदार धडक दिली.त्यामुळे मोठा स्फोट झाला. त्याचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत ऐकू आला.

 
Top