पंढरपूर शहर व तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या विविध शाखांच्या वतीने १९ तारखेला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष तसेच सैन्यामध्ये सेवा करणाऱ्या व माजी सैनिकांचा सन्मान सोहळा, नगरपालिका महिला सफाई कामगार, परिचारिका सन्मान सोहळा पार पडला. 

 पालखी सोहळा, देखावा, सनई चौघडा, पारंपरिक वाद्य, विविध वेशभूषातील भव्य दिव्य देखावे सादर करण्यात आले होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक ११ घोडे , पालखी, व विविध वेषभूषा परिधान केलेल्या व फेटा बांधलेल्या महिला , युवती व युवक वर्ग ढोल ताशासह शिवाजी चौक, ते सावरकर चौक, जुने व नवीन एस टी स्टँड ते इंदिरा गांधी चौक,ते भोसले चौक, अर्बन बँक,नाथ चौक,चौफाळा अशी निघाली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील अखिल भारतीय मराठा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते , युवती महिला, रिक्षा संघटना व माल वाहतूक संघटना, विद्यार्थी आघाडी, शिवप्रेमी सहकुटुंब, सहपरिवार सहभागी झाले होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिली .

 
Top