उत्तर प्रदेशात शुक्रवारी हरदोईच्या मंसुरपूर येथे एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांवर वीज पडल्याने काही कळायच्या आतच ९ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.अरवल पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मंसुरपूर गावाचे सरपंच सुशील अवस्थी यांचा मुलगा सौरभ अवस्थीचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. शुक्रवारी सौरभचा मृतदेह अंत्यविधीसाठी कुसुमखोर घाटाकडे नेत असताना वाटेतच अचानक अंत्ययात्रेवर वीज कोसळली. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 
Top