पंढरपूर । प्रतिनिधी,- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या उनाडमस्ती या मराठी चित्रपटातील कलाकारांचा सन्मान पंढरपूर येथील डीवीपी मल्टी स्क्वे. या चित्रपटगृहात करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपटाचे सहदिग्दर्शक नवनाथ गायकवाड यांनी केले होते. या सत्कार समारंभानिमित्त पंढरपूरातील जुने कलावंत विनय महाराज बडवे, ड्रेस डिझाईन राजेंद्र निकते, ज्येष्ठ फोटोग्राफर विलास साळुंखे हे प्रमुख पाहुणे होते.

   उनाडमस्ती या चित्रपटातील सुरभी कुलकर्णी, विशाल येडवे, सुहास भगरे, प्रियंका रेनापुरे, साहीस चौगुले, मधुबाला इंगोले, रेवती जाधव, चंद्रकांत ढगे, मेकअपमॅन महेश माने, विजय सगर, सचिन पाटील, प्रॉड्युसर डॉ.बी.एम.निळे, रमेश पाटील, चित्रपटाचे दिग्दर्शक सिध्दनाथ कोळी यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चित्रपटासाठी कलाकार, डिझाईनर व फोटोग्राफर या तिन्ही व्यक्तींची अत्यंत गरज असते यासाठी पंढरपुरातील जुन्या कलावंतांच्या मार्गदर्शनानुसार उनाडमस्ती या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले असून यापुर्वी १३ चित्रपट, २ सिरीयल एवढे चित्रपटात क्षेत्रात कार्य केलेले आहे, अशी माहिती नवनाथ गायकवाड यांनी दिली.

 
Top