पंढरपूर ( प्रतिनिधी ) - येथील भारत विकास परिषदेने समाजात उल्लेखनीय काम करणार्यां भागवताचार्य वा.ना.उत्पात,डॉ.वोहरा आणि इंजिनिअर बाळासाहेब वरुडकर यांना गौरविण्यात आल्याचे भारत विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र काणे यांनी सांगितले. 

भारत विकास परिषदेचे संस्कृती आणि संस्कार या बाबतचे कार्य देशभर सुरु आहे.हेच कार्य राष्ट्र निर्मितीस उपयुक्त ठरणार असे प्रतिपादन भागवताचार्य वा.ना.उत्पात यांनी केले. 

  गेली ४५ हून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. वोहरा,भागवताचार्य वा.ना.उत्पात आणि बांधकाम व्यवसायात आपला वेगळा कामाचा ठसा उमटविणारे बाळासाहेब वरुडकर यांना गौरविण्यात आले. या वेळी भारत विकास परिषदेचे उपाध्यक्ष वि.मा. मिराजदार,खजिनदार महावीर गांधी,महिला संघटन प्रमुख सौ माधुरी अभय जोशी,डॉ.वर्षा काणे,मेधा दाते,धनंजय मोरे आदी परिषदेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल वाघोलीकर यांनी तर ईशस्तवन सौ माधुरी जोशी,पाहुण्याचा परिचय डॉ.वर्षा काणे,मोनिका शहा,रोहिणी कोर्टीकर यांनी केले .आभार अनिल पवार यांनी मानले. 

 
Top