नवी दिल्ली -'आयएससीआर'चे अध्यक्ष चिराग त्रिवेदी यांनी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या १२व्या वार्षिक सम्मेलनात 'आयएससीआर'च्या सदस्यांनी क्लिनिकल संशोधन आणि त्याच्या लाभांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले.  'इंडियन सोसायटी ऑफ क्लिनीकल रिसर्च'ने (आयएससीआर) भारतातील वाढते आजार आणि आजारावरील इलाजासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करत संशोधन आणि नवकल्पनांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची मागणी केली आहे. 

रोगावर इलाज करण्यासाठी मोठा खर्चही येतो. भारतीयांमध्ये सतत आरोग्यविषय समस्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळे या इलाजासाठी येणाऱ्या खर्चावर संशोधन करण्यासाठी अधिक गुंतवणूकीची आवश्यकता असून नवीन संशोधनाविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज असल्याचेही चिराग त्रिवेदी यांनी सांगितले.

'आयएससीआर'ने सांगितले की, गेल्या काही दिवसांत आलेल्या आकड्यांनुसार, भारतातील क्लिनिकल ​​चाचणीची संख्या कमी होत आहे. भारतात क्लिनिकल संशोधन १.५ टक्क्यांवरून १.२ टक्क्यांपर्यंत खाली पोहचले आहे. हा आकडा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशासाठी अतिशय कमी आहे. त्यामुळे या वाढत्या आजारांच्या इलाजावर खर्च करण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. 

 
Top