पुलवामा येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पंढरपूर हॉटेल असोसिएशन व मोबाईल असोसिएशनच्या वतीने लाखाचा धनादेश देण्यात आला.

पंढरपूर:- जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ जवानांची तुकडी बसमधून जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली जीप आदळून केलेल्या हल्ल्यात भारतातील ४२ जवान शहीद झाले या शहीद जवानांच्या परिवाराला आधार देण्यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल कृपा स्विटस् बेकर्स आणि होटेल असोसिएशन पंढरपूर तसेच मोबाईल असोसिएशन यांनी प्रत्येकी एक्कावन्न  हजाराचा धनादेश प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे जवान सहायता निधीसाठी सुपूर्द केला त्याच बरोबर अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली .   

यावेळी डॉ द.ता.भोसले, पांडुरंग बापट, श्री.गणपुले, श्री.  शर्मा, वीरपिता मुन्नागीर गोसावी,अनिरूध्द बडवे आदिं सह हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य तसेच मोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

 
Top