गोफणगुंडा:

आपणच ठरवायचं असतं

केंव्हा अन कुठं कठीण व्हायच का मऊ ते का इतरांच्या हाती असतं?

आपणच असतो आपल्या

जीवनाचे शिल्पकार हे का विसरायचं असतं?!!१!!


कधी कठीण तर कधी मऊ हा व्यवहार सोडून का चालतं?

एकाच भूमिकेत राहून आपलंच खरं म्हणून का चालतं असतं? !!२!!


सर्वाना आपुलकीने वागवायच का स्वार्थासाठी तोडायच हे का इतरांनी ठरवायचं ?

सर्वाना आपलं करत एकमेकांस पूरक ठरायचे नसतं का ? !!३!!


माणसांच्या समूहात राहातांना समूहाचे नियम विनियंम पाळावेच लागतात नाही का ?

समाजात राहून एकटेच शाहण म्हणून जगण्याला अर्थ नसतो हे खरं नाही का?!!४!!


वयोमानाप्रमाणे वागणं दुसऱयांच्या सन्मान करणं ही संस्कृती उच्चतम नाही का ?

जन्मदात्यांना आदर देणं सोडून अवहेलना करणं माझंच खरं हे योग्य आहे का ५!!


वादळी टोलनाका:

ज्यांनी छळलें त्यांचेच ऋण माझ्यावर झाले 

त्यांचेमुळेच  मला खरे जग कळले !!


त्यांचे वार मला मार्ग दाखवत गेले 

तेंव्हाच आपले कोण हे समजून आले !!


जे विश्वासघातकी होते ते उघडे पडले 

तेंव्हाच विश्वास कोणावर ठेवायचा कळले !!


त्यांचे बोलणे गोड मन काळे अनुभवता आले 

माणसं ओळखण्याचे सूत्र मला तेंव्हाच  समजले  !!


त्यांचे सारे कपट कारस्थान व्यर्थ ठरले 

तेंव्हाच कळले विद्रोही वाट अशीच असते !!


त्यांचे माझ्यावर खरे तर उपकारच झाले 

त्यामुळेच मला विद्रोही म्हणून यशस्वी होता आले !!


आनंद कोठडीया, जेऊर, करमाळा ९४०४६९२२००

 
Top