पंढरपूर - प्रारंभी राष्ट्रगीत घेवुन पुलवामा हल्यात शहीद झालेले जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भारत सरकारने पाकिस्तान स्थित दहशदवादी अड्डे, ठिकाणी यावर नियंत्रण रेषा ओलांडुन वायुदला मार्फत सर्जीकल स्ट्राईक करुन दहशदवादी अड्यांचे ठिकाणचे अश्रयस्थानावर हल्ला करुन ती ठिकाणे नष्ट केली या अतुलनीय शौर्या बद्दल भारत सरकार भारताची सौन्य दले विशेषता वायु सेना यांचे पंढरपूर शहरातील नागरीक व नगरपरिषदे तर्फे  अभिनंदनाचा प्रस्ताव मंजुर केला.तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ या योजनेमध्ये नगरपरिषद पंढरपूरने  सातत्यपुर्ण कामगिरी केल्याबद्दल केंद्र शासनाकडुन सन्मान चिन्ह दिले जाणार आहेत त्याबद्दल नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले,मुख्याधिकारी अभीजीत बापट व नपाचे आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी यांचे अभिनंदनाचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला व विषयांकित काम काजास प्रारंभ केला.सुरवातीस विशेष सदर सर्वसाधारण सभा दि.२७-२-२०१९ रोजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी अंदाजपत्रक सभागृहास सादर केले


पंढरपूर नगरपरिषद सन २०१९
-२० चे पंढरपूर नगरपरिषदेचे वार्षीक अंदाजपत्रक सन २०१९-२०२० चे वार्षीत उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह र.रु.१२४,५४,२८९०/- असून वार्षिक खर्च र. रु. १२४,५१,९९,२३५/- शिल्लकी अर्थसंकल्प अखेर शिल्लक  २,२९,७२५ /- चा शिल्लक अर्थसंकल्प  सादर केला यामध्ये  शासकीय परताव्याची वार्षीक मुद्दल व त्यावरील व्याजाचे हप्ते तरतूद केली आहे.चौदावा वित्त आयोग, वैशिष्ठ्यापूर्ण योजना विशेष वैशिष्ठ्यापूर्ण योजना नगरोत्थान (राज्य स्तर) नगरोत्थान (जिल्हा स्तर) रमाई आवास योजना श्रम साफल्य योजना प्रधानमंत्री आवास योजना अग्निशमन सुरक्षा अभियान यमाई तलाव सुशोभिकरण,प्राथमिक सोयी सुविधा विकास योजना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना यांची तरतूद केली आहे.

शहरात नागरीकांना आवश्यक सुविधा पुरविणेसाठी रस्ते दुरुस्ती नविन पाईप खरेदी रस्ते बांधणी नविन गटारे या कामासाठी  सन २०१८-२०१९ मध्ये व सन २०१९-२० मध्ये भरीव तरतूद करणेत आलेली आहे.तसेच शहर विकासासाठी नामसंकीर्तन सभागृह नाट्यगृहे बांधणे, उद्यान विकास करणे पुतळ्यांची सुधारणा  व सुशोभिकरण करणे घनकचरा प्रकल्प राबविणे स्मशानभुमी सुधारणा करणे , वाहन खरेदी करणे इत्यादी साठी तरतूद करण्यात आलेली आहे.

या सभेस उपस्थित असलेले  गटनेते अनिल अभंगराव गुरुदास अभ्यंकर विरोधी नेते सुधीर धोत्रे , मुख्याधिकारी अभिजित बापट व न.पा.चे सर्व नगरसेवक,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अंदाजपत्रकाबाबत  नगरसेवक यांनी सुचविलेल्या सुचनांचा निश्चितपणाणे अंतर्भाव करण्यांचा विचार केला जाईल अध्यक्ष यांनी सभागृहास निवेदीत करुन, अशा प्रकारे चर्चा होवुन अंदापत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सभेच्या विषयाचे वाचन राजेंद्र देशपांडे व  अंदाजपत्रकाचे वाचन गणेश धारुरकर यांनी केले.

 
Top