मुंबई - अंगणवाडी सेविकांचे उग्र आंदोलन काल आझाद मैदान येथे झाले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रतोद आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंगणवाडी शिष्टमंडळाने घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक आज  आयोजित केली होती. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या केंद्र सरकारने माहे सप्टेंबर २०१८ मध्ये जी वाढ केली आहे त्याची अंमल बजावणी करण्यात यावी. तसेच इतर राज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांच्या मानधनाप्रमाणे १०,००० मानधन देण्यात यावी. तसेच अंगणवाडी सेविकांना निवृत्ती पेन्शन प्रति माहे ४५०० रु करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळातील एम.ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, सुवर्णा तळेकर, सत्यभामा तिटमे, दत्ता देशमुख ,सारिका सावंत थडानी यांनी केली. तसेच महिला व बाल विकास विभागाकडून अतिशय मंद गतीने काम होत असल्याबाबत व्यथा आणि खंत या शिष्टमंडळाने व्यक्त केली.

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी  अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या न्याय मिळावा म्हणून मानधनात वाढ करण्याबाबत राज्यावर किती पैशाच बोजा येईल यावर विचार करून  सकारात्मक निर्णय पुढील अधिवशेनात घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तर निवृत्ती पेंशनबाबत बोलतांना मुख्यमंत्री यांनी याबाबत पेंशन पुनर्रचना करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

तसेच आशा सेविका यांच्या मानधन वाढीबाबत देखील फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित आहेत याबाबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. या विषयावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

 
Top