पंढरपूर (विशाल आर्वे):- छत्रपती शिवाजी महाराज यांची 389 वी जयंती संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून मिरवणुक वगैरे अवांतर खर्चास फाटा देऊन विविध विधायक उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. 

  एपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, दुचाकी रॅली, विविध शाळांमध्ये जिजाऊ चरित्र पुस्तकांचे वाटप, शाहीरी जलसा व पोवाड्यांचा कार्यक्रम असे कार्यक्रम संपन्न झाले. तसेच घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा, शिवमॅरेथॉन, भव्य चित्रकला व रंगभरण स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. मॅरेथॉन स्पर्धेत पंढरपूर शहरातील बहुसंख्य डॉक्टर उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना पत्रकार शंकरराव कदम यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानीत करण्यात आले. 

  हे सर्व कार्यक्रम संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष प्रसाद सातपुते, विशाल आर्वे, स्वप्नील गायकवाड, अनिकेत मेटकरी, दिपक आदमिले, सुसेन गरड, संभाजी देवकर, आकाश पवार, आदित्य तारे, पप्पु देशमुख, आदी पदाधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top